यानंतर इ. स. १७२० सालीं पुण्याच्या इतिहासांत नवें पर्व सुरू झालें. या वर्षी पहिल्या बाजीरावानें पुणे हीच आपली राजधानी केली. तेथून मराठी राज्याचा विस्तार वाढत गेला. उत्तरेकडे अटकेपार मराठ्यांचे झेंडे फडकू लागले. भिमथडीच्या तट्टाणी गंगापार होऊन साऱ्या उत्तर हिंदुस्थानात आपला दरारा बसवूं लागल्या. मराठी साम्राज्याच्या विस्ताराबरोबर पुणे शहराचा विस्तार वाढू लागला आणि इ. स. १७३० ते १७९० या ६० वर्षीच्या काळांत पुण्यात १० नव्या पेठांची भर पडली. त्यामुळे पुण्याचा खरा विस्तार याच कालखंडांत झाला. असे मानावयास हरकत नाही.
इ. स. १७२१ साली पहिल्या बाजीरावानें बापूजी श्रीपत यांना पुणे परगण्याचे
सुभेदार नेमलें व या सुभ्याची वाढ करण्याची सर्व जबाबदारी त्यांच्यावर टाकली. त्यानंतर इ. स. १७३१ सालीं पहिल्या बाजीराव पेशव्यानें स्वतःसाठी शनवारवाडा बांधला. नदीच्या कांठीं जो पुरातन कोट बांधलेला होता तो इ. स. १७२८ साली पाडण्यांत आला व तेथें सरदार मंडळींना राहण्यासाठी जागा मोकळी करून देण्यांत आली. नंतर इ. स. १७३४ साली पहिल्या बाजीरावानें सध्यांची शुक्रवार पेठ बसविली.
पुणे गांवाच्या वाढीला भुताखेतांचा त्रास नको म्हणून इ. स. १७३८ साली सर्व
गांवाची शांति केल्याचा उल्लेख इतिहास-दतरी मिळतो. यात्रावत एके ठिकाण म्हटले आहे, "मांगीचे डोईवर पेढीयाची घागर देऊन गांवाभोवती टोगगा फिरविला. सांत केला. असे पेठा-पेठांनी खर्चाचा पटी घेतली असे. "
इ. स. १७५० सालीं बाळाजी बाजीरावानें गुरुवार पेठेंत नवा विस्तार वाढविला.
आणखी पांच वर्षांनीं इ. स. १७५५ सालीं नागेश आणि गणेश पेठा वसल्या. याच सुमारास नारायण पेठेचा विस्तार झाला. इ. स. १७५० ते १७६० हा कालखण्ड पुण्याच्या वैभवाचा महत्तम काळ होता. पेशवे सारखे स्वारीवर जावयाचे. त्यांना युद्धासाठी सारखा पैसा लागावयाचा. हा पैसा पुरविणारे सावकार येथें हवेत म्हणून याच काळांत पेशव्यांनीं गुजराथमधील धनिक सावकारांना आश्रय देऊन पुण्यास बोलाविलें. सैन्य वाढले त्याबरोबर इतर वस्ती वाढली.
इ. स. १७६१ मध्ये मराठ्यांना पानिपतला फार मोठा पराभव सोसावा लागला. परंतु
याच सालीं पुण्याचा प्रसिद्ध लकडी पूल बांधला गेला. यासंबंधींची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्याबाबत असे म्हटले जातें कीं, मराठे सैनिक पानिपतहून पराभूत होऊन परत आले. त्या वेळीं शहराच्या मुख्य दरवाजांतून शहरांत प्रवेश कसा करायचा ? विजयश्रीनें त्या युद्धांत माळ घातली असती तर वेगळे. परंतु एवढा मोठा अपमान झाल्यानंतर आपण दुसऱ्या रस्त्यानें शहरांत प्रवेश केला पाहिजे अशी त्यांची भावना होती. या भावनेपोटीं लकडी पूल अस्तित्वांत आला. मुठा नदीवर कांहीं लांकडी फळ्या टाकून मराठे सैनिकांनी पूल तयार केला व नंतर त्या बाजूनें शहरप्रवेश केला. पुढे कांहीं वर्षीतच पेशव्यांनी विस्कटलेला डाव पुन्हा सांवरला
आणि पुण्याची वस्ती वाढू लागली. १७६७ सालीं माधवराव पेशव्यांनीं भवानी पेठ वसविली. त्यानंतर अवघ्या दोनच वर्षांनी १७६९ सालीं सदाशिव पेठ अस्तित्यांत आली.
यानंतर इ. स. १७४४ ते १७९५ पर्यंत सवाई माधवरावानें आपल्या कर्तृत्वाने
पुण्याचे वैभव परत मिळवून दिले. या शहरांत व्यापारउदीम वाहू लागला. सराफ पेठेला सोन्या-चांदीचें नवें तेज चढलें. त्याबरोबर पुन्हा येथे इतर ठिकाणचे लोक आले व नव्या पेठा वाढू लागल्या. त्यामुळे इ. स. १७८१, १७८३ व १७८९ या वर्षी सवाई माधवरावानें अनुक्रमें घोरपडे, रास्ता व नाना पेठा वसविल्या. यानंतर पुण्याची वाढ जवळजवळ संपली. १७९७ ते १८०३ पर्यंतचा पुण्यांतील काळ अस्थिरता, जाळपोळ, दंगेधोपे यांत गेला आणि इ. स. १८०३ ते १८१८ या काळांत पुणे शहराची वाढ होण्याऐवजी पुण्याच्या आसपास संगम, खडकी, कॅन्टोन्मेंट या भागांत इंग्रजांची वस्ती वाढू लागली. येथूनच पुण्याच्या जीवनांतील अर्वाचीन युगाला प्रारंभ झाला.
इंग्रजांनी पुण्याच्या अंवतीं भंवतीं लष्करी तळ ठोकला व यांतूनच कॅन्टोन्मेंट या भागाची वाढ झाली. इंग्रजांनी आपले लक्कर या भागांत ठेवलें. कारण लष्करी दृष्ट्या हा भाग त्यांना अत्यंत महत्वाचा वाटत होता. सोलापूर, सातारा, अहमदनगर या बाजूंना जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर इंग्रजांनी आपले लष्कर ठेवले व अर्थातच लष्करी अधिकारी व इतर नागरिक त्या भागांत स्थायिक झाले. या वाढीसाठी त्यांनीं घोरपडी, माळी, मांजरी व वानवडी या खेड्यांची जागा खरेदी केली. लष्करी दृष्ट्या याला कसें महत्त्व होते याचे वर्णन ' Poons and its Battle fields' या ग्रंथांत एल्. डब्ल्यू. शेक्सपिअर यानें फार उत्तम रीतीनें केले आहे.
या भागांत लष्कर स्थिरावल्यानंतर इ. स. १८१९ साली लष्करांतील अधिकाऱ्यांसाठी
कच्चे बंगले तयार झाले. इ. स. १८२० सालीं 'सेंट मेरी' हें गॅरिसन चर्च बांधण्यात आले. इ. स. १८२२-२३ सालीं कॅन्टोन्मेंटच्या सरहद्दी निश्चित करण्यांत आल्या. या भागांत लष्करी अधिकारी स्थायिक झाल्यानंतर त्यांच्या करमणुकीसाठी काहीं सोयी करणे जरूर होते म्हणून इ. स. १८४७ साली प्रथम रेसकोर्स तयार करण्यात आले व यानंतर निरनिराळ्या शाळा, मोठीं उपाहार गृहें, दुकानें या भागांत वाढू लागली.
