भारतीय जीवनांत शेंकडों वर्षे सातत्य कां ?


प्राचीन भारतांतील प्रजातंत्रप्रवण अशीं हीं गणराज्ये जरी मौर्य साम्राज्याच्या उदरांत
गडप झालीं, तरी भारतीय समाजव्यवस्थेतील इतर ग्रामसंस्थांच्या परंपरा कधींच नष्ट झाल्या नाहींत. शेंकडों वर्षे सातत्यानें नांदत आलेल्या या ग्रामसंस्था म्हणजे ब्रिटिशांच्या सत्तारंभापूर्वीच्या भारतांतील स्थानिक स्वराज्य संस्थाच होत. या ग्रामसंस्था म्हणजे भारतीय जीवनाचा कणा होता. भारतीय समाज शेंकडों वर्षे आपल्या परंपरांच्या अधिष्ठानावर नांदत राहिला, त्याच्या जीवनांत सांस्कृतिक सातत्य राहिलें, याचें एक प्रधान कारण म्हणजे या ग्रामसंस्था. भारतीय संस्कृतीच्या उदयाच्या थोडा काळ आगे-मागें उदय पावलेल्या इजिप्शिअन, सुमेरियन, बॅबिलोनियन, असीरियन, क्रीट, फोनेशियन, ग्रीक, रोमन या संस्कृति कांहीं शतकें वैभवानें नांदल्या आणि कालांतरानें काळाच्या उदरांत गडप झाल्या. 

परंतु भारतीय संस्कृति मात्र नष्ट झाली नाहीं. तिला गेल्या ३-४ हजार वर्षांचे प्रदीर्घ सातत्य लाभले आहे. अर्थातच या सातत्याचें प्रमुख कारण हेंच आहे कीं, आपली संस्कृति ग्रामसंस्थांवर आधारलेली होती. या प्रदीर्घ काळांत येथें अनेक राजे आले आणि गेले, परंतु समाजजीवन स्थिर राहिलें. एतद्देशीय राज्यकर्त्याशिवाय शक, हूण, ग्रीक, मोंगल, तुर्क, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज इत्यादि अनेक विदेशी सत्ताकांक्षी लोकांनी येथे राज्य केली. येथें अनेक वेळां राजसिंहासने कोलमडली आणि उभारली गेलीं. राजधान्यांतून अनेक 
उत्पाती स्थित्यन्तरें घडून आली. परंतु समाजाचा तळभाग कवींच ढवळला गेला नाहीं. वादळामुळे महासागराच्या पृष्ठभागावर पर्वतप्राय लाटा उसळतात आणि तरीहि त्याचा तळ जसा शांत असतो, तसाच कांहींसा प्रकार भारतीय समाजजीवनांत झाला आहे. ग्रामसंस्थांनी या समाजाला गेलीं ३-४ हजार वर्षे शाश्वती आणि स्थैर्य दिले. या ग्रामसंस्थांचे समाजजीवनांतील स्थान अनन्यसाधारण आहे. श्री. मेटकाफ् यांनी ग्रामसंस्थांचे वर्णन अत्यंत मार्मिकपणे केले आहे. '

प्राचीन भारतांतील ग्रामसंस्थांबद्दल याप्रमाणे अनेकांनी गौरवाचे उद्गार काढले असले, तरी कांहींचा त्यांविषय प्रतिकूल अभिप्रायहि आहे. असें प्रतिकूल भाग्य करणाऱ्यांत डॉ. बी. आर. आंबेडकरांचा प्रामुख्यानें समावेश होतो. त्यांचे मत असें आहे कीं, ग्रामसंस्थांनी शेंकडों वर्षे समाजजीवन स्थिर राखले असले, तरी त्यांनी समाजांतील गतिमान् प्रेरणा न करून त्याला सर्वथा स्थितिशील (Static) बनविलें ग्रामव्यवस्थेमुळे एका खेड्याचा दुसऱ्या खेड्याशी संबंध उरला नाहीं. त्यामुळे स्वाभाविकच विचारांची देवाण-घेवाण थांबली आणि खेड्यांतील जीवन बुरसटत-खालावत गेलें. डॉ. आंबेडकरांची ग्रामसंस्थांविषय कटुतेची भावना असण्याचें प्रमुख कारण असें आहे कीं, ग्रामसंस्थांमुळे जातिभेद दृढावत गेले आणि शेंकों वर्षे टिकून राहिले. ग्रामसंस्था ही बलुतेदारी (Barter System) वर आधारलेली असल्यामुळे ती आपोआपच जातिभेदांचें पोषण करण्यास उपकारक ठरली.


अशा प्रकारें समाजशास्त्रज्ञांत प्राचीन भारतांतील ग्रामसंस्थांबद्दल पुष्कळ मतभेद आहेत.
परंतु एक गोष्ट आपणांस मान्य केली पाहिजे कीं, इंग्रजी अमदानीतील ग्रामसंस्था वा स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राचीन भारतांतील या स्थानिक स्वराज्य संस्था यांमध्ये महत्त्वाचा फरक आहे. आधुनिक स्थानिक स्वराज्य संस्था मानवी समतेवर वा लोकशाही तत्त्वांवर आधारलेल्या आहेत. त्यांच्या निर्मितींत निवडणूक पद्धतीचा पाया आहे. प्राचीन ग्रामसंस्थांमध्ये जातिभेदांमुळे सर्वांना समान अधिकार असतील, असे वाटत नाहीं. शिवाय बलुतेदारी पद्धतीमुळे ग्रामव्यवस्थेतील अधिकार आणि कर्तव्यें आनुवंशिक परंपरेने प्राप्त होत असत.

Post a Comment