या जुन्या पठडींतील शाळा पुढे किती वाढल्या अगर कमी झाल्या, हे कळावयाला मार्ग नाहीं. परंतु १८५१ पासून पुण्यातील शिक्षणक्षेत्रांत अभिनव अशी क्रांति झाली. ३ जुलै १८५१ रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यांत मुलींच्या शिक्षणाची शाळा काढली व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला या शाळेत फक्त ८ मुली होत्या; परंतु एका वर्धीतच ही संख्या ४८ वर गेली. याच शाळेत ज्योतिबांच्या पत्नी सौ. सावित्रीबाई या एक वे देखील मानधन न घेतां शिक्षिकेचें काम करीत असत.
मुलींची दुसरी शाळा रास्ता पेठैत १७ सप्टेंबर १८५१ रोज चालू झाली. आणि त्यानंतर तिसरी शाळा १५ मार्च १८५५ रोजीं बेताळ पेंडेंत सुरू झाली. बुधवार, रास्ता आणि वेताळ पेठाच या शाळांसाठी निवडण्यांत महात्मा ज्योतिबांची बहुजनसमाजामध्ये काम करण्याची दृष्टि व्यक्त होते.
प्रारंभी मुलींच्या शाळेसंबंधीं पुण्यांत फार गैरसमज होता. अनेक आपतींना तोंड देत देव महात्मा फुले यांना हा 'जगन्नाथाचा रथ' पुढे ओढीत न्यावा लागला, याची माहिती श्री. जोशी यांच्या ' पुण्याचे वर्णन ' या ब्लॉग मध्ये दिले आहे. " या मंडळीस पंतोजीहि मिळण्याची अडचण पडली. कोणी मनुष्य मुलींच्या (बायकांच्या) शाळेवर चाकरी करण्यास कबूल नव्हता व शाळेजवळ त्यास पुष्कळ पगारहि देण्यास नव्हता. शाळेत मुली अगदीं नसत. शाळेत जाणे आणि शिकणें हें एक मुलीस कुमार्गास लावण्याचें द्वारच आहे, अर्से त्या वेळचे लोक समजत, म्हणून शाळेत मुली पाठवत नसत. कित्येक मूर्ख लोकांस अर्से वाटे कीं, मुलगी शाळेत पाठविणें हें धर्माच्या विरुद्ध आहे. कित्येकांस वाटे कीं, है जातीविरुद्ध आहे.
मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न अशा प्रकारें आपत्तींना तोंड देत देत पुढे चालला होता. परंतु त्यामुळे समाजांत या प्रभाविषयीं औत्सुक्य निर्माण झाले होतें. १७ फेब्रुवारी १८५२ रोज विश्रामबाग वाड्यांत मुलींच्या शाळेचा बक्षिस-समारंभ झाला होता, त्याची माहिती सरकारी दतरांत मिळते. मुलींच्या पहिल्या शाळेचा हा पहिला-बहिला बक्षिस-समारंभ, म्हणून याला कांहीं आगळेच सामाजिक महत्त्व आहे. त्यामुळे यासंबंधींची माहिती मोढी उद्बोधक आणि मनोरंजक ठरल्यावांचून राहणार नाहीं. सरकारी रिपोर्टोत म्हटले आहे.
" पूना कॉलेजच्या चौकांत शनवार दिनांक १२ फेब्रुवारी १८५३ रोज एतद्देशीय मुलींच्या शाळांच्या परीक्षा झाल्या. समारंभाचा देखावा उत्साहाचा असून मनरंजन करण्यासारखा होता. चौकामध्ये लोकांना बसण्यासाठी चिछाईत पसरली होती. खुर्च्या आणि कोचही ठेवण्यात आले होते. चौकासभोवतालच्या गॅलरीत एका बाजूला निरनिराळ्या शाळांतील मुली व दुसऱ्या बाजूला पुना कॉलेजचे विद्यार्थी बसले होते. बाकीच्या खिडक्यांतून अनेक डोकीं डोकावून पाहत होतीं. चौकांत जवळजवळ २,००० माणसे होतीं, आणि विश्रामबाग वाड्याभोंवतीं हजारों लोक जमले होते. इतका मोठा जनसमूह यापूर्वी पुण्यांत केव्हांही जमला नव्हता.”
या अहवालावरून पुण्यांत मुलींच्या या पहिल्या शाळेनें केवढी उत्सुकता निर्माण केली होती, याची सहज कल्पना येते. सर चार्टल क्रिअर यांच्या तत्कालीन भाषणावरून असे दिसतें कीं, १८३० सालीं पुण्यांत स्त्री शिक्षणाचा पहिला प्रयोग झाला होता. इंग्रज अधिकान्याच्या परवानगीनें पेशव्यांच्या जुन्या वाड्यांत कांहीं मुलींना प्राथमिक शिक्षण देण्याचा उपक्रम कांहीं मंडळींनीं केला, परंतु या शाळेची वार्ता या कानाची त्या कानाला जाऊं नये अशी दक्षता घेण्यांत येत होती. कांहीं ओळखीच्या मित्रांच्या सात आठ वर्षांच्या मुली आणायच्या आणि ताम्र झाला कीं गुपचूप त्यांना परत पाठवायचें. हा उद्योग किती काळ चालू राहिला व या तपाला कोणतें फळ आलें, हें कळायला मार्ग नाहीं. परंतु ज्योतिबांच्या नव्या प्रयोगाला यापूर्वीच्या प्रयत्नाचा थोडफार उपयोग झाला असला पाहिजे; निदान वातावरण तयार होण्यास तरी या शाळेचें खासच सहाय्य झाले असेल.
