जहाल पक्ष l Jahal party



१८८३ ते १९२० पर्यंत जहाल, मवाळ आणि स्वतंत्र असे तीनच पक्ष वा गट या नगरपालिकेंत होते. जहाल पक्ष हा नेहमीं अल्पसंख्य राहिला. मवाळ व स्वतंत्र परस्परांशी सहकार्य करीत. १८९५ मधील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकमान्य टिळक प्रथम निवडून आले. येथूनच जहाल पक्षाचा प्रवेश या नगरपालिकेत झाला. लोकमान्य टिळकांना प्रथम फार थोडे अनुयायी लाभले. लोकमान्य टिळकांनीं ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंडाचें रणशिंग फुंकलेले असल्यानें त्यांना पुष्कळ अनुयायी मिळणे कठीण होते. कारण त्यांच्याशी संबंध ठेवणें म्हणजे अनेक अडचणींना आवाहन करणें, असाच त्याचा अर्थ होता. १८९७ च्या प्लेगच्या हाहाःकारांत सरकारी धोरणावर टीका करतांना लोकमान्य टिळकांच्या लेखणीला नवी धार आलेली होती.

अशा काळांत तर त्यांना अनुयायी मिळणे जास्तच कठीण होतें. पुढे १९०२, १९०५ या वर्षांतील निवडणुकीत त्यांच्या पक्षाचें बल वाढत गेलें. १९०७ साली सुरतेला लोकमान्य टिळकांनीं जहाल पक्षाचा प्रभाव प्रकर्षाने दाखविला. सुरत काँग्रेसनंतर काँग्रेसच्या कायापालटास प्रारंभ झाला असें सर्वत्र बोलले जाऊं लागले. राष्ट्रीय राजकारणांत लोकमान्यांच्या वाढलेल्या प्रतिडेमुळें नगरपालिकेतील जहाल पक्षाला नवें सामर्थ्य येऊं लागले. त्यानंतर या पक्षाचे रूपांतर बलशाली गटांत होणार, असा होरा व्यक्त करण्यांत येऊं लागला.

परंतु १९०८ साली लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली सरकारनें खटला भरला. वरिष्ठ न्यायासनासमोर त्यांना उभें करण्यांत आले. या आरोपांत राजद्रोही ठरून त्यांना ६ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. या शिक्षेमुळे संमिश्र प्रतिक्रिया झाल्या. कांहीं देशभक्तांच्या संतापाला नवें उम्र स्वरूप प्राप्त झाले, परंतु सामान्य नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यामुळे १९०८ च्या पुढे लोकमान्य टिळकांच्या जहाल पक्षाला नगरपालिकांहींशी ओहोटी लागली. १९१४ ते १९२० पर्यंत लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखालीं कांहीं सभासद नगरपालिकेच्या सभागृहांत जहाल पक्षीय विचार मांडीत होते. तरी देखील हा पक्ष या काळांत फारसा बाढूं शकला नाहीं.

Post a Comment