पुण्यांतील संस्कृत कॉलेज l Sanskrit College in Pune



इ. स. १८१८ ते १८५७ या कालखंडांतील पुण्यांतील शिक्षणाचा आढावा घेतांना आपणास येथील संस्कृत कॉलेजची उपेक्षा करून चालणार नाहीं. कारण, या कॉलेजचें स्थान पुण्याच्याच नव्हे तर अवध्या महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनांत फार महत्वाचे आहे. या कॉलेजांतून बाहेर पडलेले विद्यार्थी वेद-विद्येत पारंगत होते. परंतु नव्या संस्कृतीच्या सहवासांत असल्यामुळे जुन्या संस्कृत ग्रंथांकडे नव्या दृष्टिकोनांतून पाहून त्यांतील पुरोगामी विचारांचा शोध घेण्याचे कार्य ही मंडळी करीत होती. पुण्यांतील नवजीवनाच्या चळवळीचे एक महत्त्वाचे अंग म्हणून या संस्कृत कॉलेजकडे आपण पाहिले पाहिजे.

ऑक्टोबर १८२१ रोजीं दस-याच्या मुहूर्तावर विश्रामबाग बाड्यांत या कॉलेजची सुरुवात झाली. या कॉलेजची कल्पना मूर्त स्वरूपांत येण्याआर्धी सुमारे दीड दोन वर्षे त्याची पूर्वतयारी चालली होती. १८१८ मध्ये पेशबाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रजी राज्याचे डेकन भागाचे कमिशनर श्री. चॅपलिन हे पुण्यास असतांना येथे एखादें संस्कृत कॉलेज काढावे असा विचार ते करूं लागले, पेशवाईच्या अस्तानंतर पुण्यांतील पुष्कळ शास्त्री मंडळी अस्वस्थ होती. राजाश्रय सुटल्यामुळे त्यांच्या ज्ञानसाधनेवर नवी आपत्ति आली होती. या अडचणींतून मार्ग काढावा, या शास्त्री मंडळींना संतुष्ट करावें व शक्य असल्यास हिंदूंच्या प्राचीन धर्मग्रंथांचें मंथन करावें, म्हणून संस्कृत कॉलेज काढण्याची कल्पना श्री. चॅपलिन यांनी ४ नोव्हेंबर १८२० रोजी मुंबई सरकारला कळविली. एल्फिन्स्टन यांना ही कल्पना पसंत पडली व त्यांनी ६ ऑक्टोबर १८२१ रोजीं ती कल्पना प्रत्यक्षांत आणली. १८२१ पासून १८५३ पर्यंत विश्रामबाग वाड्यांत हें संस्कृत कॉलेज चाललें. पुढें तें कॉलेज आणि बुधवार वाड्यांतील पूना इंग्लिश स्कूल यांचें नव्या पूना कॉलेजमध्ये रूपांतर झालें. हें पूना कॉलेज इ. स. १८६७ नंतर डेक्कन कॉलेज म्हणून प्रसिद्धीस आलें. संस्कृत कॉलेजचें सारें आयुष्य ३०-३१ वर्षोचें. परंतु या काळांत बरेच विद्यार्थी या कॉलेजांतून बाहेर पडले. पुण्याच्या नागरजीवनावर या संस्कृत विद्याध्ययनाचा निश्चित इष्ट परिणाम झाला.

या कॉलेजांत स्थूलमानानें न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, व्याकरण, ज्योतिष, अलंकार, वैद्यकशास्त्र, बेदान्त, यजुर्वेद, ऋग्वेद इत्यादि विषय शिकविले जात. परंतु संस्कृत पंडित हे जुन्या रूढ कल्पनांना चिकटून राहिल्यानें या कॉलेजच्या जीवनांत कांहीं संघर्षाचे प्रसंग उद्भवले. १८३७ सालीं मेजर कॅन्डी यांनीं विश्रामबाग वाड्यांतील संस्कृतच्या एका वर्गात एक टेबल पाठविलें. त्याबरोबर कांहीं शास्त्री प्राध्यापकांनीं मेजर कॅन्डीचा निषेध करून तें टेबल परत घेऊन जाण्यास सांगितलें. संस्कृतच्या वर्गात ही पाश्चात्य वस्तु ठेवल्यानें तेथील पावित्र्याचा भंग होतो, असे त्यांनी सांगितले.

हे प्रकरण कसेंबसें मिटलें. पुढें स्वतः मेजर कॅन्डी एकदां संस्कृतचें अध्यापन चालू असलेल्या एका वर्गात गेले. त्याबरोबर तेथील शास्त्र्यांनी शिकविण्याचें बंद केलें. मेजर कॅन्डी तेथून दुसऱ्या वर्गात गेले; तेथेंहि अशीच स्तब्धता पाळण्यांत आली. तिसऱ्या वर्गोत याच अनुभवाची पुनरावृत्ति झाली. याचा खुलासा विचारतां तीनहि शास्त्री प्राध्यापकांनी सांगितलें, "वेद पवित्र असतात व त्यांचे पठण गोऱ्या इसमासमोर करतां येत नाहीं. ११ या कॉलेजमध्ये घडलेले हे प्रसंग केवळ तत्कालीन समाजजीवनाचीं प्रतिबिंबें होत. यामध्ये कोणालाहि दोष देण्याचा हेतु नाही. या संस्कृत कॉलेजचें एक कार्य मात्र महत्त्वाचे आहे. पुण्यांत आजहि संस्कृत ज्ञानाची परंपरा मोठी आहे. प्राचीन काळापासून चालू असलेली ही परंपरा अबाधित चालू ठेवण्याचे मूळ सुमारें १२५ वर्षापूर्वी येथे निघालेल्या या संस्कृत कॉलेजमध्ये आहे, असे म्हटले तर तें खासच बस्तुस्थितीला सोडून होणार नाहीं.

Post a Comment