आपली मुलींची शाळा बरी चालली आहे, असे पाहतांच ज्योतिबांनीं पुण्यांत दुसऱ्या एका महान् उपक्रमाला सुरुवात केली. १८५२ च्या मेमध्ये त्यांनी वेताळ पेठेंत अस्पृश्यांसाठी एक शाळा उघडली. २९ मे १८५२ च्या 'पूना ऑब्झर्व्हर' या पत्रांत यासंबंधीची बातमी प्रसिद्ध झाली आहे. तींत म्हटले आहे, "परोपकार बुद्धीनें प्रेरित झालेले एक माळी जातीचे हिंदु गृहस्थ यांनीं स्वखर्चाने अस्पृश्यांकरितां एक शाळा काढली आहे. हें ऐकून एतद्देशीय लोकांच्या सुधारणेच्छु मंडळांना फार आनंद होईल. ही शाळा बेताळ पेठेंत आहे. येथे महार, मांग आणि पटवारी अशा जातींच्या मुलींना शिकविण्यांत येतें. याच पत्राच्या २१ ऑगस्ट १८५१ च्या अंकांत एक स्फुट लिहिले आहे. त्यांत म्हटले आहे, “ज्योति गोविंदराव फुले यांनी वेताळ पेठेंत दोन शाळा स्थापन केल्या आहेत. महार, धेड, मांग आणि चांभार अशा शूद्रांच्या मुलांकरितां एक शाळा असून दुसरी त्याच लोकांच्या मुलींकरितां आहे. या दोन्ही शाळांत शिकविण्याचें व देखरेखीचे काम ज्योतिराव करतात. त्यांना मदतीला ब्राह्मण मास्तर आहेत. या शाळांचा खर्च ज्योतिराव स्वतःच्या पैशाने करतात आणि या काम त्यांना एतद्देशीय व युरोपियन लोकांची मदत आहे."
परंतु प्रयासानें चालविलेली ही अस्पृश्यांची शाळा लवकरच बंद पडली. याचामत ज्योतित्रांनीं आपल्या एका अहवालांत माहिती दिली आहे. ते म्हणतात, "परंतु अतिशूद्वास शिकविल्या मुळे आमच्या जातवाल्यांस फार बाईट बाटले व प्रत्यक्ष माझ्या बापाने देखील मला घरांतून घालबिलें. तेव्हां निरुपाय होऊन आपल्या रक्षणाबद्दल कांहीं कामगिरी धरली पाहिजे, असे प्राप्त झाले आणि शाळाहि बंद झाली. नंतर ती आणखी चालवावी म्हणून प्रयत्न केला. परंतु ते कठीण पडलें. कारण कोणी जागा देईना व जागा बांधण्यास रुपये नव्हते व लोक आपली मुलै परंतु काही काळ गेल्यानंतर ज्योतिघांनी पुन्हा कंबर कसली आणि शाळेच्या उद्योगाला सुरुवात केली.
या सर्व अडचणींवर त्यांनी लवकरच मात केली. हा इतिहास त्यांनी आपल्या शाळेच्या अहवालांत दिला आहे. तो त्यांच्याच शब्दांत देणे उचित होईल. ते म्हणतात, "लहुजी विन रात्रु राऊत मांग व राणवा महार यांनी शिकण्यापासून कसे कसे लाभ आहेत, हे आपल्या जातवाल्यांस समजावून त्यांची मुले पाठविण्याची तयारी केली व सदाशिव बल्लाळ गोवंडे यांनी शाळेसाठी जागा देऊन ती शाळा पुन्हा बरीच चा लागली आणि मुलें फार जमलीं म्हणून कृपा करून विष्णुपंत थत्ते यांनी शिकविण्यास मला मदत केली. तरी महार लोकांस पाणी घेऊ देईनात. यामुळे शाळेला पाण्याचा खर्च लागे आणि ती पोरें गरीब असल्यामुळे वस्त्रेदि यावीं लागत आणि उत्तरोत्तर मुलांची संख्या वाढल्यामुळे दुसरी जागा घेणे प्राप्त झाले.”
महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी प्राथमिक शिक्षणाच्या शाळा काढून येथील नागर जीवनांत फार मोठी क्रांति केली. शेंकडों वर्षे ज्ञानाला आंचवलेल्या स्त्रियांना व शूद्रांना त्यांनीं प्रथम प्रकाशाची वाट दाखविण्याचा थोर प्रयत्न केला. चातुर्वर्ण्य केव्हां दृढमूल झाले यात्रा काल निश्चित करता येत नाहीं. परंतु इसवी सनापूर्वीच्या ७ व्या शतकांतील ऋग्वेदांत जे उल्लेख मिळतात त्यांवरून त्या काळांत चातुर्वर्ण्य पद्धति भारतीय समाजांत दृढ होत चालली होती असें वाटतें. हैं खरें असेल तर इसवी सनापूर्वी ७ व्या शतका पासून ते इसवी सनाच्या १९ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत गेली साडेतीन हजार वर्षे अस्पृश्यांना ज्ञानाचीं द्वारें चंद होतीं. महात्मा फुले यांनी प्रथम या सनातन कल्पनेवर प्रहार केला. या दृष्टीने त्यांचा हा प्राथमिक शिक्षणाचा प्रयत्न येथील नवजीवनाच्या चळवळीचा क्रांतिकारी आविष्कार होता, असेंच मानावे लागेल. पुण्यांत अश्यांमध्ये शिक्षणाचें प्रमाण इतर ठिकाणांपुष्कळच अधिक आहे, याचे श्रेय अंशतः तरी महात्मा फुले यांनी १८५२ मध्ये सुरू पेक्षां केलेल्या अस्पृश्यांच्या शिक्षणाला आहे. सर्च हिंदुस्थानांत अस्पृश्यांना ज्ञानाचीं द्वारें खुलीं करण्याचा पहिला प्रयत्न प्रथम पुण्यांतच महात्मा फुल्यांनी केला.
