पुण्यांतील बाजारपेठ l Markets in Pune



इ. स. १८११ साली कर्नल वेल्स हा पुण्याला आला असतांना त्यानें येथील मंडईचें जें वर्णन केले आहे, ते या दृष्टीने उद्बोधक आहे. तो म्हणतो, "येथील फळबाजार नानाविध फळांनी खच्चून भरला आहे. येथे कलिंगड, खरबुजें, अंजीर, खजूर, मनुका, डाळिों, सफरचंद, बदाम, आंबे यांची गर्दी झाली आहे. कस्तुरीचा व्यापारदेखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच प्रमाणे अनेक प्रकारच्या देशी भाज्यांनी सर्व मंडई भरून गेली आहे. थोडक्यांत, सर्व मराठी साम्राज्याच्या व्यापाराचे एक मोठें केंद्र म्हणजे पुणे शहर झाले आहे. शहरांत यूरोप, चीन आणि हिंदुस्थानांतील निरनिराळे प्रान्त येथील अनेक वस्तु विक्रीला मांडून ठेवलेल्या आहेत."

पुण्याच्या या वैभवाची आणखी कांहीं वर्णने आपणांस इतरांच्या पुस्तकांतून मिळतात. कर्नल वेल्स हा इंग्रज अधिकारी त्या वेळीं पुण्याचा रहिवासी बनला होता. तो पुण्याचें वर्णन करतांना म्हणतो, "सहा लक्ष मनुष्यें व एक लक्ष ऐश हजार घरें, येणेकरून पुणे अगदीं गजबजून गेले होतें. नदीचे पलिकडील उंच टेकड्यांवर संध्याकाळी उभे राहिले असता पर्वतीचे मैदान व रस्ते माणसांनी फुलन गेलेले दिसत. एकंदरीत हा सर्व देखावा मोठा मनोहर दिसे. पुण्यातील मोठमोठे मुत्सद्दी महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणी उच्च अधिकारावर होते. हे सर्व मोठे अधिकारी आपापली लमकायें पुण्यास येऊन उरकीत असत. त्यामुळे नानाविध मंगल मधुर वाद्यांचा ध्वनि शहरांत कानांवर पडे. सायंकाळी सुगंधी पुष्पांचे हार, तुरे, गजरे यांचा मंद गंध सर्व शहरभर पसरलेला असे."

Post a Comment