मवाळ पक्ष l Soft Party


मवाळ पक्षाचा जन्म १८९५ साली झाला, असे मानायला हरकत नाहीं. ना. गो. कृ. गोखले, श्री. ह. ना. आपटे हे या काळांत या पक्षाचे अध्वर्यू होते. त्यांच्यामार्फत मयाळ पक्षाच्या धोरणाचे पडसाद नगरपालिकेच्या सभागृहांत उठत होते. या पक्षाचे संख्याबल जहाल पक्षाशी तुलना करतां पुष्कळच जास्त होतें. व्यापारी, मोठे घरमालक, दलाल इत्यादि वर्ग या पक्षाच्या गटांत असत. सरकारी रोष ओढवून घेण्यास हा वर्ग सहसा तयार नसे. शिवाय, सरकारच्या सहकार्यानें होतील तेवढ्या नगरसुधारणा कराव्या अशी श्रद्धा त्यांच्या धोरणामार्गे होती.

जहाल-मवाळांशिवाय स्वतंत्र सभासदांची संख्या या नगरपालिकेमध्ये या कालखंडांत शेंकडा ५० ते ७० पर्यंत होती. हा वर्ग पुष्कळ वेळां मवाळ गटाशीं सहकार्य करून नगरपालिकेतील प्रभांचा निर्णय घेई.

१९२० नंतर मात्र नगरपालिकेच्या राजकीय क्षितिजावर नवनवीन पक्षांचा उदय झाला. पूर्वीचें जहाल-मबाळ असे पक्ष अस्तंगत होऊन राष्ट्रीय कॉंग्रेस, हिंदु सभा, मुस्लिम लीग, सत्यशोधक, शे. का. फे., स्वतंत्र, असे गट अस्तित्वांत आले. महाराष्ट्राच्या राजकीय जीवनांत निर्माण झालेल्या या पक्षांचा प्रवेश स्वाभाविकपणेंच नगरपालिकांमध्येंहि झाला. शिवाय १९२१ सालीं पुणे नगरपालिकेच्या लोकनियुक्त सभासदांची संख्या २६ वरून ४५ वर गेली. स्वाभाविकच पक्षांच्या वाढीला अधिक क्षेत्र मिळालें.

Post a Comment