पुन्हा वैभवाचे दिवस l Glory days again


इ. स. १८५० नंतर शहराच्या वाढीला सुरवात झाली. त्यानंतर २५-३० वर्षामध्ये येथील रविवार, बुधवार या पेंठा गजबजून जाऊं लागल्या. शहराला पुन्हा वैभवाचे दिवस येऊं लागले. आबा बावाजी जाधव या लावणीकाराने १८७५-८० च्या सुमाराच्या पुण्याचे वर्णन एका लावणीत केले आहे. त्याने रेखाटलेले शब्दचित्र आजद्दि आपणांस मोठे चित्तवेधक आणि विलोभनीय वाढल्यावांचून राहणार नाहीं. तो म्हणतो,

" पुणे शहरामधी बुधवार आजीब शहराचा बाजार |

त्याच्या जोडिला घडामोडीला आहे आदितवार बेभार ।।

इकडे रस्ता कापडवाले करी सणगाचा व्यापार |

तसेच तिकडे एक ओळिंत भरून गेले कासार ॥

इकडे माणिक मोती विकती हिरे जवाहीर आणि कंकर ।

तसेच तिकडे सोने रुपेंही विकती झोकाने सोनार ||

इकडे हौद बुधवाराचा नाभी फरसखान्याचा सेजार ।

'तिकडे हौद फडक्यांचा शोभती गेट त्याच्या नाक्यावर

वरील वर्णनावर लालिल्याचा शिडकावा झालेला आहे. ते वर्णन एका लावणीकाराच्या लेखणीतून उतरलेले आहे, त्यामुळे एखाद्या समाजशास्त्रज्ञाच्या वर्णनामधील कांटेकोरपणा त्यांत दिसणार नाही. परंतु तरी देखील त्यामधून आपणांस तत्कालीन पुण्याच्या जीवनाची कल्पना यावयाला सहाय्य होते.

Post a Comment