पुण्याचे पहिले कोतवाल होण्याचा मान बाळाजी नारायण केतकर यांना मिळाला. यांच्याकडे स्थूलमानानें सभ्यांच्या डी. एस. पी. चे अधिकार होते. त्यांच्या हाताखालीं नोकर-चाकरहि पुष्कळ होते. शहराच्या बाहेर टेहळणी करण्यासाठीं कांहीं शिबंदी किंवा स्वारांची एक खास तुकडी होती. शिवाय गांवांत रात्रभर गस्त घालण्यासाठीं कांहीं नोकर ठेवले होते. शहरांत निरनिराळ्या पेठांमध्ये कांहीं चौक्या बसविल्या होत्या व त्या त्या पेठेंतील गुन्ह्यांची नोंद त्या त्या पेठेतील चौकीवर केली जाई. त्या वेळी रात्री ११ वाजतां कोतवाल तोफ उडवी. यानंतर रस्त्यावर कोणींहि हिंडतां कामा नये असा दंडक असे. रस्त्यावर कोणी दिसल्यास त्याला अटकेंत ठेवण्याचे अधिकार पोलिसांना वा गस्तवाल्यांना दिले होते. यानंतर दुसरी तोफ पहांटे ४ वाजतां उडविली जाई. पहांटेच्या या तोफेनंतर शहरांतील संचार व व्यवहार सुरू होत.
कोतवालाचे अधिकार शहररक्षणाच्या दृष्टीनें सध्यांच्या डी. एस्. पी. या अधिकाऱ्याचे असत, परंतु याशिवाय त्याच्या अधिकाराच्या इतरराह कांहीं कक्षा होत्या. शहरांतील रस्त्यांची दुरुस्ती करणे, ड्रेनेज, पाणीपुरवठा यांची व्यवस्था पाहाणे, शहरांतील स्वच्छता सांभाळणे इत्यादींबाबतचे त्याचे अधिकार विद्यमान् महापालिकेच्या कमिशनरांचे असत. याशिवाय शहरांत राज्यासंबंधी कांहीं खलबतें चालू आहेत का, यासंबंधी गुत बातम्या काढून त्या पेशव्यांना पुरविण्याचे गुप्तहेर खात्याचे काम त्याला करावे लागे. वरील सर्व अधिकारांबरोबर छोट्या छोट्या गुन्हयांच्या अपराधांबद्दल गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे न्यायालयीन अधिकार कोतवालाला असत. याचा अर्थ तीन चार अधिकान्यांची कामें त्याच्याकडे सोपविली होती. इ. स. १७६४ पासून मराठी राज्याच्या अस्तापर्यंत ही जागा कायम होती.
इ. स. १७६८ सालीं शहराची कोतवाली जनार्दन हरी यांच्याकडे देण्यांत आली. या वेळीं पेशव्यांनी त्यांची नेमणूक करतांना त्यांना पुढील आज्ञा व अधिकार दिले होते
१) शहरांतील निरनिराळ्या पेठांत घडणाऱ्या बारिक-सारिक अपराधांचा न्यायनिवाडा प्रत्येक पेठेतील कमाविसदारानें द्यावा, परंतु मोठ्या स्वरूपाचे गुन्हे कोतवालानें स्वतः हाताळावेत.
२) बाजारपेठेंतील धान्याचे भाव कोतवालानें निश्चित करावेत व ते लोकांच्या माहितीसाठी दररोज प्रसिद्ध करावेत.
३) पेशव्यांना निरनिराळ्या कामांसाठी वेळोवेळी जे मजूर लागतील ते पुरविण्याची जबाबदारी कोतवालानें स्वतःच्या अंगावर घ्यावी.
४) शहर हद्दीतील जागेची खरेदी-विक्री कोतवालाच्या परवानगीनें करावी.
५) शहरांतील सर्व लोकसंख्येची नोंद त्यानें ठेवावी व त्याचप्रमाणें आल्या गेलेल्या इसमांवर व त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावें.
६) कोतवालाचें मुख्य कार्यालय बुधवार पेठेंत ठेवायें.
७) गल्ली, बोळ, रस्ते, घरें यासंबंधींचे तंटे-बखेडे कोतवालानें सोडवावेत.
८) जुगान्यांनीं जुगार खेळण्यासाठी कोतवालाकडून परवानगी काढावी. परवानगी न घेतां कोणी जुगार खेळतांना दिसल्यास त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा द्यावी.
९) नवीन आशा द्यावयाची असली तर गांवभर दवंडी पिटवून ती जाहीर करावी.
यानंतर इ. स. १७७५ व इ. स. १७७६ सालीं अनंतराव काशी व धोंडों बाबाजी यांची अनुक्रमे शहराचे कोतवाल म्हणून नेमणूक झाली. या वेळपर्यंत कोतवालाच्या कामाचा विस्तारहि पुष्कळ झालेला होता. प्रारंभी त्याच्या हाताखालीं फक्त १८ शिपाई होते; आतां ही संख्या १८ वरून ७८ वर गेली होती. त्यांच्या पगाराचा खर्च देखील १,४४९ रुपयांवरून ५,२९५ रुपयांपर्यंत गेला होता.
सर्व कोतवालांमध्ये एक अत्यंत गाजलेला कोतवाल म्हणजे घाशीराम कोतवाल हा होय. हा मूळचा औरंगाबाद भागांत निरनिराळीं कुटुंचे त्या वेळीं पुण्याला आपले नशीब काढायला येत. त्याप्रमाणे हाहि तिकडून पुण्यास आला. पुण्यास आल्यावर त्याचा लवकरच नाना पंडणविसांशी परिचय झाला व नाना फडणविसांचा त्याच्यावर लोभ जडला. नाना फडणवीस म्हणजे त्या काळांतील मराठी साम्राज्यामधील एक कर्तुमकर्तुम् शक्ति होती. अशा एका प्रभावी पुरुषाची मर्जी बसल्यावर त्याच्या उत्कर्षाला बिलंब तो किती लागणार १ इ. स. १७७७ सालीं त्याच्या अंगावर पुणे शहराच्या कोतवालीचीं महावस्त्रें चढविली गेली. पुढे इ. स. १७८२ साली त्याची या जागेवर कायम स्वरूपाची नेमणूक झाली. त्याची नेमणूक करतांना पेशव्यांनी त्याला पुढील प्रकारच्या आज्ञा दिल्या होत्या.
१) कोतवालाच्या कार्यालयांतील कारकून व शिपाई यांना कामावरून कमी करण्यापूर्वी सर अमीन या वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी.
२) नारायण व शनवार पेठांत मनुष्यवस्ती खूप वाढली आहे त्यामुळे त्या भागांत दोन चौक्या बसवाव्यात.
३) शहरांतील निरनिराळ्या पेठांतील सर्व गुप्त बातम्या दररोज पेशव्यांच्या कानांवर घालाव्यात.
४) शहरांतील चोन्या माऱ्यांवर लक्ष ठेवून गुन्हेगारांस त्वरित शासन करावें.
५) विवाहित बायकांना वेश्याव्यवसाय करायला परवानगी देऊ नये.
घाशीरामानें अधिकार घेतल्याबरोबर नारायण व शनवार या पेठांत दोन नव्या चौक्या बसविल्या. त्यापूर्वी पुण्यांत सोमवार, वेताळ, रविवार व बुधवारांतील कोतवालचावडी अशा चार चौक्या होत्या.
दोन नव्या चौक्या झाल्यामुळे व कारभारहि वाढल्यामुळे इ. स. १७८९ साली शहरांतील शिपायांची संख्या ११५ पर्यंत गेली. शहरांतील गुन्ह्यांच्या दंडापासून प्रतिवर्षी कोतवालाकडे सुमारे २७-२८ हजार रुपये गोळा होत असत. घाशीराम कोतवालाच्या काळांत शहरांत अनैतिक गुन्ह्यांची संख्या वाढली होती असे म्हणतात. तरी देखील त्यानें शहरावर फार जरब बसविली होती. तो निष्ठुरपणे सर्व प्रकरणांचा निकाल लाबीत असे. अशा एका शहरप्रशासकाचा शेवट मात्र अत्यंत भयानक रीतीनें पुण्याच्या जवळच चार मैलांवर झाला. यासंबंधींची ‘चक्षुर्वै सत्यम्' हकीकत सर चार्ल्स मॅलेट या अधिकाऱ्यानें लिहून ठेविली आहे. ती वाचत असतांना आजहि आपल्या अंगावर शहारे यावेत, इतकी ही घटना विलक्षण आहे. तिचा सारांश असा –
“इ. स. १७९१ सालांतील गोष्ट. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यांत पुण्यांत दक्षिणेकडून कांहीं तेलंगी ब्राह्मण आले. भांबुर्डा भागांतील तोफ रात्री ९ वाजतां उडे. त्यानंतर तिकडे कोणी हिंडू फिरूं नये असा दंडक होता. अशा वेळी सुमारें ३४ तेलंगी ब्राह्मण हा दंडक मोडून रस्त्याने फिरत होते. त्या भागांतील शिपायांनी या सर्व ब्राह्मणांना पकडले व एका छोट्या खोलीत कोंडून ठेवले. दुर्दैवानें, सकाळीं खोली उघडून पाहतां त्यांच्यापैकी २१ ब्राह्मण गुदमरून मरण पावलेले आढळले. झाले ! हां हां म्हणतां वणव्याप्रमाणे ही बार्ता शहरभर पसरली. थोड्याच वेळांत ब्राह्मणांचा मोर्चा घाशीराम कोतवालाच्या घराकडे वळला. भयभीत झालेला घाशीराम प्राण वाचविण्याच्या आशेनें पेशव्यांच्या आश्रयाला धांवला, परंतु खवळलेला जनसमुदाय काबूत ठेवणे पेशव्यांनाहि अवघड बाटूं लागले. त्यांनी कोतवालाला त्या संतत, प्रक्षुब्ध जमावाच्या ताब्यात दिले. पुढे या जमावानें गाढवावर उलट्या बाजूला बांधून त्याची शहरभर धिंड काढली व शेवटी त्याला गांवाच्या बाहेर नेऊन दगडांनीं ठेंचून मारला व त्याचा शेवट केला. ही दुर्दैवी घटना दि. ३१ ऑगस्ट १७९१ रोजी घडली.
घाशीराम कोतवालाचा अशा प्रकारें अंत झाल्यानंतर अनंतराव काशी याची याच वर्षी या जागेवर नेमणूक झाली. श्री. अनंतराव काशी यानें या जागेवर ५-६ वर्षे काम केले. त्यानंतर इ. स. १७९६ सालीं दुसरा बाजीराव गादीवर आला. त्यानें या जागेवर नेमणुका करण्याची प्रथा बंद करून तिचा लिलांब करण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे कोतवालावरील सरकारी नियंत्रण सैल झाले व त्याची नागरिकांवरील जुलमी राजवट वाढीला लागली. इं. स. १८०० पासून १८१७ पर्यंत पुण्याचा कारभार अशा प्रकारच्या मक्तेदार कोतवालांनी केला. इ. स. १८०० सालीं विठोजी नाईक गायकवाड याजकडे पहिला मक्ता गेला. त्यानें पेशव्यांकडून १,२०,००० रुपयांस हा मक्ता विकत घेतला. दुसऱ्या बाजीरावाला सतत पैशाची निकड असे. अशा पद्धतीमुळे पैसा निश्चित आणि विपुल मिळतो अशी त्याची कल्पना होती, म्हणून त्यानें ही प्रथा सुरू केली. परंतु आपला सर्व पैसा वसूल करून शिवाय वर प्राप्ति करण्याची कोशीस हे कोतवाल करीत. या प्रकारामध्ये पुण्याच्या नागरिकांवर कित्येक वेळी अन्यायहि होत असे. मराठी राज्याच्या अंताबरोबर पुण्यांतील ही कोतवाल-पद्धति संपुष्टांत आली.
पुण्यांतील या कोतवाली पद्धतीमुळे शहरांतील चोऱ्या मान्या, खून, दरोडे यांना फार मोठ्या प्रमाणांत आळा बसला होता, हेंच या पद्धतीचें प्रमुख ऐतिहासिक कार्य आहे. मुंबई इलाख्याचे माजी राज्यपाल व एक प्रमुख प्रशासक सर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी या पद्धतीविषयीं पुढीलप्रमाणें लिहून ठेवले आहे.
पुणे पोलीस प्रमुखाला त्या वेळीं एकूण ९,००० रुपये पगार होता. त्याच्या नोकर वर्गामध्ये शिपाई, पोलीस, घोडदळ, रामोशी इत्यादींचा भरणा मोठा होता. पोलीस प्रमुखाची जागा त्या वेळीं किफायतशीर समजली जात होती. कांहीं झालें तरी त्या वेळचे पोलीस खातें चोन्या, दरोडे, खून यांस प्रतिबंध घालण्याच्या बाबतींत फार कार्यक्षम होतें.
