देवीची साथ



आपल्या देशांत देवींची सांथ अगदी प्राचीन काळापासून उद्भवत असे. प्राचीन साहित्यांतून आपणांस या सांथीचीं वर्णनें वाचावयास मिळतात. हिंदुस्थानप्रमाणेंच, चीन, ईजिप्त, याहि देशांमध्ये ही सांथ पूर्वी मोठ्या प्रमाणावर पसरत असे. स्थूलमानानें उष्ण कटिबंधांतील सर्व देशांमध्ये ही सांथ अधिक तीव्र स्वरूपांत दिसते.

या सांथीचा शास्त्रीय पद्धतीनें पहिला विचार झाला तो १७६९ सालीं. त्या वेळीं डॉ. सिडनहॅम या संशोधकाच्या लक्षांत आलें कीं, ही सांथ गांवांत सगळीकडे पसरली, तरी गवळीवाड्यापासून ती चार पावलें दूरच राहते. येथूनच त्याच्या संशोधनकार्यास सुरवात झाली. गवळी गायींच्या धारा काढतात व त्यामुळे त्यांना देवी होत नाहींत, असेंहि त्याच्या लक्षांत आलें. यासंबंधीं अधिक खोळांत जाऊन विचार करतां, त्याला असें कळून चुकलें कीं, देवींची सांथ गायींमध्येदेखील येत असते. परंतु गायींना झालेल्या देवींच्या फोड्यांमध्यें जी लस असते, ती माणसाच्या शरीरांत गेली तर त्याची प्रतिकारशक्ति वाढते. गायींच्या धारा काढतांना त्यांच्या सडांबरील फोड्यांमधून आपोआप ही लस गवळ्यांच्या शरीरात जाते. त्याचमुळे मुख्यत्वेकरून गवळी लोक देवींपासून बचावले आहेत.

गवळ्याच्या मुलीमुळे नवा शोध

तथापि १७६९ सालीं या सांथीवरील संशोधन येथेच थांबले. त्यानंतर १७९६ साली एडवर्ड जेनर यांनी या प्रभावर अधिक संशोधन करून माणसांना गो-देवी टोंचण्याचा शोध लावला. या शोधाचा जन्म एका अशिक्षित, खेडवळ गवळ्याच्या मुलीच्या सहजोगारांत झाला आहे. त्या मुलीला देवी आलेल्या आहेत का, अशी पृच्छा डॉक्टर करीत होते, तेव्हां ती मुलगी झटकन् डॉक्टरांना म्हणाली, "मला गायीच्या देवी येऊन गेलेल्या आहेत. आतां मला त्या पुन्हा कशा येतील ?

पुण्यांत प्रथम देवीची लस

या तिच्या उद्गारांवरून डॉक्टरांच्या डोक्यांत विचारच सुरू झाली. यानंतर त्यांनी देवी आलेल्या गायीच्या फोड्यांतून लस घेऊन ती माणसाच्या शरीरांत टोचण्याचे अनेक प्रयोग केले. यासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले आणि आश्चर्य असें कीं, त्यांच्या या प्रयोगाला फार मोठे यश आलें. देवींची सांथ आटोक्यांत आणण्याचा हा अतिशय गुणकारी उपाय मानवाच्या हाती आला. १७९६ नंतर लागलीच युरोपमध्ये या शोधाचा बोलबाला झाला. या वेळीं इंग्लंड आणि हिंदुस्थान यांमध्यें पुष्कळ मोठ्या प्रमाणावर दळणवळण चालू होते. भारतीय समाज पाश्चात्य संस्कृतीच्या समीप आला होता. याच काळांत – १७९८ सालीं डॉ. कोट्स हे इंग्लंडमधून हिंदुस्थानांत आले होते. पुणे परगण्याचे इंग्रजांचे सुभेदार (रेसिडेंट ) क्लोज यांनी त्यांना मुद्दाम या परगण्यांत ठेवून घेतलें होतें. 

कोट्स हे पुण्यास असतांना येथें देवीची सांथ पसरली. स्त्रिया आणि लहान मुलें देवींनीं हैराण झालीं. श्री. कोट्स यांनी इंग्लंड मधून देवींची लस मागविली आणि तिचा प्रयोग पुण्यांत करण्याचे ठरविलें. त्यासाठी आधी त्यांनी पेशव्यांचे सहकार्य मिळविले. आणि त्यांच्याच करवीं पुणे शहरांत दवंडी पिटवून सर्व लोकांना शनवारवाड्यासमोर जमण्यास सांगितलें. शेंकडों लोक शनवारवाड्यासमोर गोळा झाले. त्या वेळीं डॉ. कोट्स यांनी या लशीचा उपयोग काय होतो, त्यामुळें देवींच्या सांथीला प्रतिबंध कसा होतो, याची माहिती दिली. परंतु तरी देखील लोकांचा त्यावर विश्वास बसेना. संशयाकुल नजरेनें ते पाहातच राहिले. 

शेवटीं डॉ. कोट्स यांनी ही लस स्वतःला टोंचून घेतली. नंतर इंग्रज सर सुभेदार श्री. क्लोज याला ती टोंचली. पेशव्यांच्या कुटुंबांतील कांहीं व्यक्तींना ती टोंचली. नंतर पुणेकरांचा या नव्या औषधावर थोडाफार विश्वास बसला. त्यांच्यापैकीं पुष्कळ लोक धिटाईनें पुढे आले. देवी येण्याची भीति या औषधामुळे फार कमी झाली आहे, याबद्दल त्यांची "खात्री पटल्याचें दिसूं लागले. कांहीं लोकांनी तर असा हट्ट धरला, " देवीच्या दोन फुल्या फार कमी आहेत, आम्हांस चार फुल्या करा.

१८१६ सालीं येथें देवींची सांथ पुन्हा पसरली. त्या वेळीं ४८७२ लोकांना टोचण्यांत आलें. त्यांपैकीं ४,६६ ३ लॊक यांचले. अवघे २०९ लोक मृत्यूमुखी पडले. परंतु त्यानंतर जनतेमध्यें देवीची लस हळू हळू मिय होऊं लागली. एल्फिन्स्टन या मुंबई प्रांताच्या कर्तबगार आणि दूर दृष्टीच्या राज्यपालाचे श्रम याला कारणीभूत झालेले आहेत. देवींची लस टोचणे धर्मदृष्ट्या निषिद्ध आहे, असें कांहीं पंडित मंडळींचे मत होते. ही लस टोचण्याला कांहीं शास्त्राधार नाहीं, असें त्यांनीं आप्रहपूर्वक सांगितले. त्या वेळीं ल्फिन्स्टन यांनें संस्कृतमध्ये एक श्लोक रचला आणि तो जुना बाटावा म्हणून एका जुन्या कागदावर लिहिला व ' हाच शास्त्राधार आहे’ म्हणून लोकांना लस टोंचून घेण्यास प्रवृत्त केले !

देवींची लस टोचण्याची पद्धति १८३० मध्ये मुंबई प्रांतांतील अनेक शहरांमध्ये रुढ झाली होती. मुंबई सरकारनें देवींची लस टोंचण्यासाठीं १८५८ मध्ये एक स्वतंत्र खातेच सुरू केले. मुंबई प्रांतांतील आरोग्य खात्याचा जन्म या देवींवरील प्रतिबंधक उपचारांत आहे. त्या नंतर १८७७ सालीं मुंबई सरकारनें देवींसंबंधींचा कायदा संमत करून तो मुंबई शहराला लागू केला. या कायद्यान्वयें मूल जन्मल्यापासून सहा महिन्यांच्या आंत देवी काढून घेण्याची सरकारनें सक्ती केली.

Post a Comment