मराठेशाहीतील पुणे l Pune in the Maratha Empire


इ. स. १६२० साली पुण्याच्या इतिहासांत नवें प्रकरण सुरू झाले. इ. स. १६२० ते १७२० पर्यंत पुण्याच्या भावी वैभवाची पार्श्वभूमि तयार झाली. इ. स. १७२० ते १८२० पर्यंत या शहरांत ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्याचा परिणाम महाराष्ट्रावर आणि साऱ्या भारतावर झाला. या दृष्टीनें इ. स. १६२० ते १८२० हा कालखण्ड पुण्याच्या इतिहासांत विशेष महत्त्वाचा ठरणारा आहे.

इ. स. १६२१ साली शहाजी भोसले याने आदिलशाहीतील सरदार रामराव याचा पराभव करून पुणे परगणा निजामशाहीत समाविष्ट केला. मलीकंबर हा त्या वेळी निजामशाहीची सारी धुरा वाहत होता, आणि या कर्तबगार राजाचा विश्वासू सेनापति म्हणून शहाजीचा लौकिक होता. शहाजीच्या कर्तृत्वामुळे मलीकंबराने शहाजीस पुणे व शिरवळ परगण्यांची जहागिरी दिली. परंतु पुढे लवकरच मलिकंबर व शहाजी यांचे बिनसले ते परस्परांचे शत्रू बनले. त्याबरोबर दशहाजीने पुणे व शिरवळ परगण्यांवर स्वतंत्रपणे आपले राज्य सुरू केले. लिकंबराने सैन्य पाठवून शहाजीचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. परंतु शहाजीने या प्रसंगाला चांगले तोंड दिले आणि तो लागलीच विजापूरच्या आदिलशहाकडे सरदार म्हणून काम पाहू लागला. इ. स. १६२५ ते १६२८ पर्यंत शहाजीने आदिलशाहीची एक निष्ठपणे
सेवा केली. परंतु इ. स. १६२७ साली इब्राहिम आदिलशहा मरण पावला, आणि तेथून विजापूरच्या आदिलशाहीमध्ये गुंतागुंतीचे राजकारण सुरू झाले. शहाजीलाहि या अंतर्गत राजकारणाची धग पोचली. 

आदिलशाही सोडून द्यावी अशा विचारांत शहाजी असतांना अहमदनगरच्या निजामशहाने त्याला पुन्हा परत बोलाविले. याला एक कारण असे की, इ.स. १६२८ च्या सुमारास दिल्लीचा मोगल बादशहा शहाजहान याने अहमदनगरकडे आपली वक्रदृष्टि वळविली होती. शहाजीसारख्या सेनापतीची अशा विकट प्रसंगी मदत मिळाली तर बरे होईल असे साहजिकच निजामशहाला वाटले. शहाजीनें या विनंतीला मान दिला. कारण ज्याच्यामुळे त्यानें अहमदनगरच्या निजामशहाची नोकरी सोडली होती तो मलिकंबर इ. स. १६२६ साली मरण पावला होता. त्यामुळे इ. स. १६२८ पासून शहाजी निजामशाहीचा सरदार म्हणून पुणे परगण्याचा कारभार पाहू लागला.

इसवी सन १६२८ ते १६३० पर्यंत त्याने ही कामगिरी केली. परंतु अवध्या दोन वर्षांनंतर शहाजीला पुन्हा निजामशाहीला रामराम ठोकून बाहेर पडावे लागले. कारण इ. स. १६३० साली निजामशहाने शहाजीचे सासरे लखुजी जाधवराव यांचा विश्वासघातानें खून केला. शहाजीनें या प्रकाराचा निषेध म्हणून आपल्या नोकरीचें त्यागपत्र सादर केले व बिजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा यांच्या प्रांतांत बंड पुकारले.

त्यानंतर इ. स. १६३१ सालीं विजापूरच्या राजाचा सरदार मुरार जगदेव हा पुण्यावर चालून आला आणि त्यानें हैं शहर काबीज केले. त्यानंतर त्याने लूटमार आणि जाळपोळ करून सर्व गांव उध्वस्त करून टाकले. याच वेळी जातांना त्याने गांवावरून गाढवाचा नांगर फिरविला. त्याच सुमारास येथे मोठा दुष्काळ पडून पुणे व अंवतींर्भवतींचा सारा प्रदेश निर्मनुष्य झाला.

यानंतर इ. स. १६३६ साली विजापूरच्या आदिलशहानें शहाजीस पुणे व सुपें या जहागिरी दिल्या. इ. स. १६३७ साली शहाजीनें दादोजी कोंडदेव याला पुण्यास पाठविलें व त्यालाच या परगण्याचा प्रमुख नेमले.

दादोजी कोंडदेवानें त्यानंतर पुण्याची पुनर्रचना करण्याचे ठरविले. त्यापूर्वी त्यानें कांहीं धार्मिक विधी पार पाडले. मुरारने इ. स. १६३१ साली या गांवावरून गाढवाचा नांगर फिरविला होता, त्यामुळे आतां येथे भुर्तेखेतें, चेद्रुक राहतात अशी लोकांची समजूत झाली होती. ही कल्पना काढून टाकण्यासाठी दादोजी कोंडदेवानें धार्मिक विधी केले आणि त्याने सोन्याचा नांगर करून गांवावरून फिरविला व नंतर भोंवतालचे लोकांना येथे येऊन राहण्यास विनंति केली. लोकांना येथील पेठांचे पांच वर्षांचे कौल दिले. आसपासची काळी भोर जमीन गेलीं कांहीं वर्षे पडीक पडली होती ती लागवडीखाली आणली. त्यामुळे येथे पुन्हा मनुष्यवस्ती वाढू लागली. त्याच सुमारास दादोजी कोंडदेवानें (सध्यांच्या जिजामाता बागेजवळ) आपल्या धाकट्या धन्यासाठी 'लाल महाल' म्हणून एक छोटेखानी पण सुंदर राजवाडा बांधला. त्यानंतर पुणे ही जहागिरीची राजधानी बनली व येथूनच सर्व व्यवहार पार पडूं लागले. आजच्या पुण्याचा पाया याच काळांत घातला गेला, व याचें पुष्कळसें श्रेय दादोजी कोंडदेवाकडे जाते.

यानंतर इ. स. १६५६ च्या सुमारास शिवाजीमहाराजांनी आपल्या स्वराज्यस्थापनेच्या उद्योगाला येथूनच सुरुवात केली. विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचे मोंगल राजे यांच्याशीं त्यांना सतत सामना ग्रावा लागला. इ. स. १६६० सालीं मेमध्यें मोंगल सेनापति शाहिस्तेखान पुण्यावर चालून आला. त्याने पुण्याची लूटमार केली व गांव आपल्या तान्यांत घेतलें आणि शिवाजीच्या राजवाड्यांत - लाल महालांत- त्यानें मुक्काम ठोकला. पुढे इ. स.

१६६३ साली शिवाजीमहाराजांनी या शाहिस्तेखानास आपल्या कौशल्याने आणि पराक्रमानें सळो की पळो करून सोडलें. त्यानंतर त्यानें है शहर सोडलें. परंतु शिवाजीमहाराजांनीं आंपली राजधानीदेखील पुण्याहून रायगडावर नेली. कारण, लष्करी दृष्ट्या पुणे हे अगदी सपाट प्रदेशावर होतें, आणि अशा ठिकाणी राहून शत्रूंशी मुकाबला करणे कठिण होतें. त्यानंतर १६८० पर्यंत कमीअधिक प्रमाणांत या शहराचे महत्त्व वाढत होतें. परंतु शिवाजीच्या मृत्यू पासून तो १७२० पर्यंत पुण्याचे ऐतिहासिक महत्व बेताचेंच होते.

Post a Comment