राष्ट्रकुटांनी या गांवावर कांहीं काळ सत्ता गाजबिली. परंतु पुढे दक्षिणेंत यादवांचें राज्य प्रबळ झाले आणि त्यांनी राष्ट्रकुटांचा हा प्रदेश जिंकलेला असावा. यादवांनीं या शहरावर सुमारें तीन शतकें राज्य केलें. यादव राजांनी या भागांत जें राज्य केलें, त्याची निशाणी अद्यापही या शहरावर आहे. मुठा नदीच्या कांठावर धाकट्या व थोरल्या शेखसलयाच्या जवळ जे घाट बांधलेले आहेत ते यादवकालीन बांधकामाची साक्ष देतात. महाराष्ट्रांत यादवांनी जे जे घाट बांधलेले आहेत त्या सर्व घाटांशीं येथील घाटांचें विलक्षण साम्य आहे. यादवकालीन राज्याचा एवढा एकच सुस्पष्ट ठसा या शहराच्या जीवनावर आज दिसतो.
मुस्लिम राजे -
परंतु इ. स. १२९४ सालीं अल्लाउद्दीन खिलजीनें यादव घराण्यांतील शेवटचा राजा राजा रामदेव याच्यावर स्वारी केली व हा मुलुख आपल्या ताब्यांत घेतला. या काळांत पुण्यास मुस्लिम फकीर आले व त्यांनी पूर्वीची नारायणेश्वर व पुण्येश्वर हीं हिंदूंची देवळें भ्रष्ट करून तेथेंच दर्गे स्थापन गेले. थोरला व धाकटा शेखसला म्हणून हे दर्गे आज प्रसिद्ध आहेत. या दर्ग्याची बांधणी, खांत्र, शिल्प, नदी किनाऱ्याचें साहचर्य इत्यादि गोष्टी पाहिल्यास हे दर्गे म्हणजेच पूर्वीचीं देवालयें होती हैं चटकन लक्षांत येतें.
या काळांत बरया अरवानें चाकणला किल्ला बांधला व तेथून पुणे परगण्याचा कारभार हाकावयास सुरुवात केली. त्यानंतर मुस्लिम वस्ती बाहूं लागली व या काळांत पुण्याचा 'कसचे पुणे' म्हणून सर्वत्र उल्लेख होऊं लागला.
इ. स. १३२० साली तमलखांनी दिल्लीपति खिलजी सुलतान याच्याकडून पुणे परगणा जिंकून घेतला. परंतु महंमद तघलखालादेखील येथे फार काळ राज्य करावयास मिळाले नाही. इ. स. १३४७ साली महंमद तलखाचा सरदार हसन कांगो बहामनी याने आपल्या धन्या विरुद्ध बंडाचे निशाण उभारले आणि दक्षिणेंत बहामनी राज्य स्थापिले. येथून या प्रांतांत 'बहामनी काळ सुरू झाला.
इ. स. १३४७ ते १४८० पर्यंत बहामनी राजांनी इकडे आपला अम्मल चांगला बसविला. परंतु पुढे इ. स. १४८१ नंतर बहामनी राज्याला वाईट दिवस आले. पुढे लवकरच या विशाल बहामनी राज्याचे पांच तुकडे झाले. अहमदनगरची निजामशाही व विजापूरवी आदिलशाही हे त्यांपैकी दोन तुकडे होत. ही दोन्ही राज्ये इ. स. १४९० सालीं स्थापन झाली. या वेळीं पुणे परगणा प्रथम अहमदनगरच्या निजामशाहीच्या अमलाखाली गेला. पुणे भाग निजामशाहीच्या तात्र्यांत असतांना बंगालचे श्री. चैतन्यस्वामी तीर्थयात्रा करीत करीत पुण्यास आले होते. त्यांचे शिष्य गोविंददास यांनी तत्कालीन पुणे शहराचे वर्णन लिहून ठेवलेलें आहे. त्यांच्या वर्णनाचा सारांश असा : 'पुणे शहराच्या जवळ एक तळे आहे. तेथील अनेक ब्राह्मण आपल्या शिव्यगणांसह वेदमंत्रांचा जयोष करण्यांत निमग्न झाले होते. या गांवांत अनेक पाठशाळा असून या शाळांतून भगवत् गीता व भागवत यांचे पाठ दिले जातात.
यानंतर १६ व्या शतकाच्या उत्तरार्धीत भोसले घराण्याने या भागावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. मालोजी भोसले हे प्रारंभी मनसबदारीच्या सामान्य हुद्यावर होते. परंतु कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी इ. स. १५९५ सालीं अहमदनगरच्या राजाकडून या परगण्याची जहागिरी मिळविली.
परंतु इ. स. १६०० साली दिल्लीपति मोंगल बादशहा अकबर यांनी दक्षिणेकडे आपली दृष्टि बळविली आणि अहमदनगरची निजामशाही घेतली. साहजिकच पुणे परगणा देखील दिल्लीच्या बादशहाच्या ताब्यांत गेला परंतु अस्थिरता हाच मध्ययुगाचा धर्म असल्यानें हे दिल्लीपतीचें राज्यहि फार काळ टिकेले नाहीं. अवघ्या २० वर्षांनंतर इ. स. १६२० सालीं मलिकंबरानें शौर्याची शर्थ करून पुन्हा मोंगलांकडून अहमदनगरचें राज्य मिळविलें व पुणे भाग हमदनगरच्या निजामशाहीकडे गेला तेव्हांपासून मराठ्यांच्या पराक्रमाला व कर्तृत्वाला प्रारंभ झाला.
